esakal | मेट्रो-2 B च्या मार्गिकेवर तयार होणार तीन आकर्षक पूल; एमएमआरडीएने मागवल्या निविदा;
sakal

बोलून बातमी शोधा

METRO 2B

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नागरी बांधकाम कंपन्यांकडून मुंबई मेट्रो-2 बी या मार्गिकेवरील तीन आयकॉनिक पूल उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

मेट्रो-2 B च्या मार्गिकेवर तयार होणार तीन आकर्षक पूल; एमएमआरडीएने मागवल्या निविदा;

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नागरी बांधकाम कंपन्यांकडून मुंबई मेट्रो-2 बी या मार्गिकेवरील तीन आयकॉनिक पूल उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. 23.6 किमीच्या उन्नत मार्गिकवर तीन आयकॉनिक पूल डिझाइनफॅक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तयार करणार असून हे पूल वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी), वाकोला नाला आणि मिठी नदी येथे बांधण्यात येणार आहेत.
 
डी.एन. नगर ते मंडालेदरम्यान 23.63 किमी उन्नत मार्गिका तयार होणार आहे. या संपूर्ण मार्गिकेदरम्यान एकूण 22 स्थानके असणार आहेत. मेट्रो-2 बी या संपूर्ण उन्नत मार्गिकेसाठी 10,986 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या मार्गिकेमध्ये इंटरचेंजची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही मार्गिका डी.एन. नगरमध्ये घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-1 मार्गिकेला जोडली जाणार आहे. 

 हेही वाचा: बालमृत्यू रोखण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराचा पुढाकार; जाणून घ्या काय करणार आहेत...

तर बीकेसीमध्ये कुलाबा ते सीप्झदरम्यान होणाऱ्या मेट्रो-3 मार्गिकेला छेदणार आहे. तर चेंबूरमध्ये मोनोरेलला आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर मेट्रो-4 मार्गिकेला जोडली जाणार आहे.  यापैकी 15 स्थानक (10 आणि 5) आणि 31 हेक्टरवरील मानखुर्द डेपो अशी तीन टप्प्यातली कामे सिंप्लेक्स आणि आरसीसी- एमझेडबी या कंपन्यांना नोव्हेंबर, 2018 मध्ये देण्यात आली होती.  

त्या तीन कामांवरील खर्च 1058 कोटी, 474 कोटी आणि 464 कोटी रुपये इतका होता. मात्र, जवळपास दीड वर्ष उलट्यांतरही या टप्प्यातील जेमतेम 5 टक्के काम पूर्ण झाले आहे.  त्यामुळे आता पुन्हा या निविदांना 28 जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. 

हेही वाचा: भाजपनंतर आता मनसे संजय राऊतांवर आक्रमक; लगावला सणसणीत टोला

लाँकडाऊनमुळे निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने मुदतवाढ देण्यात आले आहे असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान वरळी सी लिंकसारख्या आकर्षक पुलाप्रमाणे एमएमआरडीए या पुलाची उभारणी करणार आहे.

MMRDA asked for tenders for iconic bridge in metro2 B