

Mahalaxmi automated pedestrian bridge
ESakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मल्टिमॉडल 'महालक्ष्मी कनेक्टिव्हिटी' प्रकल्पांतर्गत महालक्ष्मी येथे मोनोरेल, मेट्रो-३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणारा स्वयंचलित पादचारी पूल (ट्रॅव्हलेटरयुक्त) उभारला जात आहे. सध्या या प्रकल्पाचे ९० टक्के काम झाले असून लवकरच तो मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.