मिठी नदीतून दररोज पाच टन तरंगणाऱ्या कचऱ्याची उपकरणाद्वारे विल्हेवाट

Mithi River
Mithi Riversakal media
Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (mmrda) मिठी नदीच्या (mithi river) स्वच्छतेचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार नदीतील कचरा (river garbage) गोळा करण्यासाठी वाकोला ब्रिज (vakola bridge) येथे उपकरण (machine) बसविण्यात येणार आहे. सुरुवातीच्या कालावधीत दररोज नदीतून तरंगणारा 5 टन तरंगत्या कचऱ्याचे संकलन (garbage remove machine)निश्चित केले असून टप्प्याटप्याने हे प्रमाण 50 टन प्रति दिन वाढविण्यात येणार आहे.

एमएमआरडीएमार्फत राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बीकेसी मिठी नदी येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. या प्रकल्पानुसार मिठी नदीमधील तरंगता कचरा गोळा करून त्याचे पृथ्थकरण पुढील तीन महिन्यांसाठी केले जाणार आहे. गोळा केलेला कचरा वेगळा करून त्याचे वैज्ञानिक पध्दतीने विश्लेषण केले जाईल. वेगळा केलेला कचरा पुनर्वापरासाठी पाठविला जाणार असून नदी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेसह कंपन्यांचे उत्पादन विल्हेवाट साहित्य, पॅकेजिंग साहित्याचा पुनर्वापर करण्यासाठी उपयोग केला जाईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. शिवाय जैवविविधतेला हानी पोहचणार नाही.

Mithi River
लसीकरणापासून वंचित असलेल्यांना लस देऊन पत्नीचा वाढदिवस साजरा

मिठी प्रकल्पातून धारावीमधील काही स्थानिकांना रोजगार देखील दिला जाणार आहे. प्रकल्प सौर उर्जेद्वारे चार्ज केलेल्या बॅटरीच्या बॅकअपद्वारे होईल. तीन पाळ्यात हे काम केले जाईल. एकाच ठिकाणाहून दररोज सुमारे पाच टन तरंगता कचरा संकलित केला जाईल. टप्प्याटप्प्याने ही क्षमता दिवसाला 50 टन प्रतिदिन वाढविण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधतेला हानी पोहचणार नाही. प्रकल्पात माहिती मिळविण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. प्रकल्पाचा कालावधी अठरा महिने आहे. या प्रकल्पासाठी पाचशे कोटी इतक्या रक्कमेचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे. प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर केला जाईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.

तसेच मुंबई महापालिकेच्या मदतीने प्राधिकरण सांडपाण्यावर उपचार करण्यासाठी, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारून नदीत विरघळलेला ऑक्सिजन वाढविण्यासाठी आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड पातळी कमी करण्यासाठी कार्य करण्यात येईल. त्यामुळे जल वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनास मदत होईल. जागरुकता कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत मिठी नदीकाठी कुर्ला, सायन आणि धारावीमधील लोकांना सेंद्रीय कचरा प्रक्रिया, कंपोस्ट बनविणे, कोरडा कचरा गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com