MMRDA project: मेट्रो 6 ला जोडणार 5 उड्डाणपूल, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या ट्रॅफिकला मिळणार दिलासा

MMRDA project
MMRDA project

MMRDA Project: लिंक रोड अंधेरी पश्चिम ते पूनम नगर, महाकाली लेणी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) पर्यंत 5.7 किमीच्या पट्ट्यामध्ये वाहतूक कोंडीतून आता सुटका होणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (एमएमआरडीए) मेट्रो लाईन 6 ला जोडून स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीपर्यंतचे पाच उड्डाणपूल बांधणार आहे, याचे बांधकाम देखील सुरू झाले आहे.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलांचे काम लवकरच सुरू होणार असून, गेल्या महिनाभरात कंत्राटदार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिकेने स्वामी विवेकानंद (SV) रोड ते लक्ष्मी नगर, जोगेश्वरीपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. जो 2015 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल', असे त्या पुलाचे नाव आहे. हा पूल अंदाजे 0.92 किमी लांबीचा आहे.

मेट्रो लाईन-6 एमएमआरडीए बांधत असल्याने उड्डाणपुलाचा उर्वरित भाग पूर्ण करण्याची जबाबदारी बीएमसीने एमएमआरडीएकडे सोपवली आहे.

MMRDA project
Israel Hamas War : इस्रायलची ताकद वाढणार! जो बायडन यांच्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकही जाणार इस्त्राइल दौऱ्यावर

मेट्रो आणि उड्डाणपूलचा ओव्हरलॅपिंग विभाग (डबल डेकर) 2.58 किमी प्रलंबित आहे. तसेच डबल डेकर उड्डाणपूल आणि  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल यांना जोडणारे 2.57 किमी बांधकाम देखील प्रलंबित आहे. हे काम  MMRDA द्वारे अंमलात आणले जाईल.  पाचही उड्डाणपूल जास्त रहदारी असलेल्या रस्त्यांवरून जातील. या उड्डाणपुलांची उंची इतर उड्डाणपुलांच्या तुलनेत देखील जास्त आहे. त्यामुळे एमएमआरडीकडे मोठं आव्हान असेल. (Mumbai Latest News)

उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी बीएमसी एमएमआरडीएला टप्प्याटप्प्याने 768.85 कोटी देणार आहे. BMC ने आधीच MMRDA कडे 384.5 कोटी (एकूण 50%) जमा केले आहेत.

MMRDA project
RBI Penalty: RBI ची मोठी कारवाई, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँकेला ठोठावला 16.14 कोटींचा दंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com