Mumbai Pollution: एमएमआरडीएच्या प्रकल्पांमुळे प्रदूषण, उच्चस्तरीय समितीचा अहवाल

Mumbai Air Pollution: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांमुळे प्रदूषण वाढत चालले आहे, असा अहवाल उच्चस्तरीय समितीने सादर केला आहे.
Air pollution
Air pollution sakal
Updated on: 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास (एमएमआरडीए) प्राधिकरणाच्या प्रकल्पांमुळे माती आणि बांधकामाचा राडारोडा आसपासच्या परिसरात टाकण्यात येतो. परिणामी वायू प्रदूषणात अधिकच भर पडत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालय नियुक्त उच्चस्तरीय समितीने आपल्या अहवालात नोंदवले. शिवडी परिसरात राडारोडा टाकल्याचे छायाचित्रांसह निदर्शनास आणून देऊनही संबंधितांवर कारवाई न केल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व प्रकल्पांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले.

Loading content, please wait...