
मुंबई : एमएमआरडीएकडून बोरिवली (मागाठाणे) ते ठाणे (टिकुजिनीवाडी) दरम्यान दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला वेग आला असून एमएमआरडीएने आर्थिक मोबदला, स्थायी निवासस्थान आणि एसआरमार्फत पुनर्वसन असे तीन पर्याय जाहीर केले आहेत. त्यामुळे संबंधित प्रकल्पबाधितांना दिलासा मिळणार आहे.