

Thane Traffic
ESakal
ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तीन ठिकाणी पादचारी पुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्तकनगर नाका येथे नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून, घोडबंदर मार्गावरील मानपाडा आणि आर मॉल परिसरातील जुने पूल हटवून त्या ठिकाणी नवीन पूल अथवा स्कायवॉक उभारण्यात येणार आहेत. या तिन्ही कामांचा संपूर्ण खर्च एमएमआरडीए करणार असून, त्यासाठी ठाणे महापालिकेच्या महासभेची मंजुरी घेतली जाणार आहे.