Raj Thackeray 11Office bearers Join BJP
ESakal
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षातील बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा राजकीय धक्का बसला आहे. वांद्रे विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले असून येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ११ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.