esakal | बहुसदस्यीय प्रभाग रचनेविरोधात महाड तालुक्यात मनसे आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बहुसदस्यीय प्रभाग रचनेविरोधात महाड तालुक्यात मनसे आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) बहुसदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला आहे. त्यानुसार महाडच्या (mahad) तहसीलदारांना पक्षातर्फे नुकतेच एक निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेत बदल केला.

महापालिका, पालिका आणि नगरपंचायतींसाठी नव्याने प्रभाग रचना केली. त्याला मनसे अध्यक्ष राज ठाको यांनी प्रखर शब्दात विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रभाग रचनेमुळे राज्य सरकारने फक्त स्वतःच्या सोयीनुसार काम केले आहे. त्याच्यामध्ये नागरिकांच्या विकासाचा कुठलाही दृष्टिकोन दिसत नाही. यामुळे भ्रष्टाचार आणि घोडेबाजार वाढीस लागणार आहे. याला मनसेतर्फे अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे.

हेही वाचा: मुंबईतील 'या' परिसरात पाणी कपात; काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

यानुसार महाड मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे, शहर उपाध्यक्ष लक्ष्मण कंक, दीपक चव्हाण, कामगार सेना जिल्हा संघटक बंटी पाटील, तालुका संघटक अतुल चित्रे, महाड शहर संघटक प्रदीप दळवी, चित्रपट सेनातालुका अध्यक्ष चंद्रहास नगरकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top