मंदिर उघडण्यासाठी मनसेचे आंदोलन; विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून केली महाआरती

दीपक घरत
Monday, 7 September 2020

मॉल उघडण्यास परवानगी देता मग मंदिरे उघडण्यास परवानगी का नाही असा सवाल उपस्थित करत पनवेल मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे शहरातील विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून महा आरती करण्याचे आंदोलन सोमवारी (ता.7) करण्यात आले.

 

पनवेल -  मॉल उघडण्यास परवानगी देता मग मंदिरे उघडण्यास परवानगी का नाही असा सवाल उपस्थित करत पनवेल मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे शहरातील विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून महाआरती करण्याचे आंदोलन सोमवारी (ता.7) करण्यात आले.

'त्या' इशाऱ्यानंतर अदानी ग्रुपचे शिष्ठमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; वाढीव वीजबिलांबाबत चर्चा

कोरोना संसर्गा च्या पार्शवभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शासना तर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये देश भरातील उद्योग धंद्यांसोबत व्यवसाईक वापरातील मॉल, अपार्टमेंट बाजारपेठा, व्यायाम शाळा, तसेच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कालांतराने लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात ढील देत, इतर उद्योग धंद्यांसोबत मॉल देखील उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी मंदिर उघडण्याबाबत मात्र शासनाकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने शासनाच्या या  अतार्किक निर्णया विरोधात तुम्ही मंदिर खुली करणार नसाल तर मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आदेशाने आम्ही ती भक्तांकरिता खुली करू असा पवित्रा घेत आक्रमक झालेल्या पनवेल मनसे कार्यकर्त्यानी विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून महाआरतीचे नियोजन केले.

मनसे तर्फे आयोजित या आंदोलनांमध्ये पनवेल मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS agitation to open temple; Maha Aarti by breaking the locks of Virupaksha temple