'नव्या दमानं, नव्या आयुधांसह...! वर्धापनदिनी राज ठाकरे करणार नवी घोषणा? : MNS Anniversary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

MNS Anniversary: 'नव्या दमानं, नव्या आयुधांसह...! वर्धापनदिनी राज ठाकरे करणार नवी घोषणा?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अर्थात मनसेचा आज वर्धापनदिन आहे. यानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन नुकतीच एक पोस्ट करण्यात आली आहे. यामुळं सध्याकाळी होणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (MNS anniversary Raj Thackeray would be made new announcement)

मनसेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जी पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकांना संबोधित करतानाचा राज ठाकरे यांचा पाठमोरा फोटो असून त्यावर 'नव्या दमानं, नव्या आयुधांसह नवनिर्माणासाठी सज्ज!' असं असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी ६ वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन या थिएटरमध्ये मनसेचा वर्धापनदिन साजरा होणार आहे. यावेळी राज ठाकरे मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी पक्षाची ध्येय-धोरणं मांडताना ते नव्या काही घोषणा करण्याची शक्यता मनसेच्या पोस्टमुळं निर्माण झाली आहे.