esakal | पावसाळी दुर्घटनांच्या प्रस्तावावरुन शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena-Bjp

पावसाळी दुर्घटनांच्या प्रस्तावावरुन शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिकेच्या (BMC) स्थायी आज शिवसेना भाजप (Shivsena-BJP) मध्ये पुन्हा वाद पेटला होता. पावसातील दुर्घटनांबाबत (Monsoon Accident) चर्चा करण्याचा प्रस्ताव आज भाजपने स्थायी समितीत मांडला होता.मात्र,शिवसेनेने दुर्घटनांमधील मृतांना श्रध्दांजली (Condolence) वाहून सभाच तहकुब केली. यावर अपयशापासून सत्ताधारी आणि प्रशासनाला (Government) पळ काढता येणार नाही असा टोला भाजपने लगावला.तर,भाजप मृतांचे राजकरण करत आहे.असे प्रतिउत्तर शिवसेनेकडून देण्यात आले. ( Monsoon people Death Tragedy Shivsena - BJP Criticizing Each Other-nss91)

मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.अशा घटना वारंवार घटत असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी स्थायी समितीची बैठक तहकुब करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला होता.मात्र,अध्यक्ष यशवंत जाधव यांनी श्रध्दांजलीचा प्रस्ताव मांडत कोणतीही चर्चा न करता बैठक तहकुब केली.असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.

हेही वाचा: उपनगरी लोकल प्रवास बंदी घालणाऱ्या सरकारला धडा शिकवणार - केशव उपाध्ये

स्थायी समितीत अशा दुर्घटना कशा रोखता येतील त्यावर काय उपाय करता येतील याबाबत चर्चा करता आली असती.नगरसेवकांना त्यांची मतं मांडता आली असती.मात्र,सदस्यांना बोलण्याची संधीच देण्यात आली नाही असा आक्षेपही शिंदे यांनी नोंदवला.दरड कोसळण्याचा धोका असल्याच्या ठिकाणी तत्काळ संरक्षण भिंत बांधणे इतर उपाय करणे गरजेचे आहे.असेही शिंदे यांनी नमुद केले.भाजपची हि भुमिका म्हणजे मृतांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.दुखद घटना घडलेली असताना भाजपाला राजकरण सुचत आहे असे प्रतिउत्तर अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

loading image