मोठी बातमी: राज ठाकरे हाजिर हो, बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी

पूजा विचारे
Thursday, 28 January 2021

राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. २०१४ला वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना वाॅरंट बजावण्यात आलं आहे.

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. २०१४ला वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना वाॅरंट बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ६ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२६ जानेवारी २०२१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कडून वाशी टोल नाका फोडला होता. याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून राज ठाकरे यांना वाॅरंट जारी करण्यात आले आहे. 

(बातमी अपडेट होत आहे.)

mns chief Raj Thackeray issued warrant by Belapur court Toll Naka Vandalism case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns chief Raj Thackeray issued warrant by Belapur court Toll Naka Vandalism case