'तुम्हाला कोणी हटवणार नाही', राज ठाकरेंचा मच्छीमार आणि पोलिसांच्या कुटुंबीयांना शब्द

ज्या वसाहतीचं नूतनीकरण नुकतंचं झालं होतं, ती धोकादायक आहे असं सांगितलं आहे.
Raj-Thackeray
Raj-Thackeraygoogle

मुंबई: नायगाव पोलीस वसाहतीमध्ये (police lane) राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief Raj thackeray) यांची भेट घेतली. नायगाव मधील नवीन पोलीस वसाहत (new police colony) धोकादायक जाहीर करण्यात आली असून घरे खाली करा (vaccate home) अशी नोटीस देण्यात आली आहे. ज्या वसाहतीचं नूतनीकरण नुकतंचं झालं होतं, ती धोकादायक आहे असं सांगितलं आहे. तसेच जिकडे आम्हाला पाठवत आहेत त्या सुद्धा जुन्या इमारती आहेत असं पोलीस कुटुंबीयाचं म्हणणं आहे. त्यावर राज ठाकरेंनी पोलिसांच्या कुटुंबीयांना आश्वस्त केलं. काळजी करु नका. दोन दिवसांत अजितदादा पवार आणि संबंधित विभागाशी चर्चा करू मार्ग काढू असे आश्वासन दिले.

दादर तुलसी पाईप रोड येथील मच्छिमारांनी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मार्केट स्थलांतरित करत एरोलीत हलविण्याबाबत अचानक आलेल्या नोटिशीनंतर मच्छिमारांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मुंबईतून ऐरोली नवी मुंबईत स्थलांतरित करत असतांना आम्हाला विश्वासात का घेतले नाही अशी नाराजी व्यक्त करत मार्ग काढा अशी विनंती या मच्छिमारांनी राज ठाकरे यांच्याकडे केली.

Raj-Thackeray
आम्ही राष्ट्रवादीला बुडवू, शिवसेना खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

यावेळी राज ठाकरे यांनी तुम्हाला कोणी हटवणार नाही. आहे तेथेच व्यवसाय करा असा सल्ला दिला. मुंबई महापालिका प्रशासनाशी संवाद साधत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी यावेळी या मच्छिमारांना दिले आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com