esakal | जानेवारीच्या अखेरपासून पावलं का नाही उचलली? राज ठाकरेंचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

raj.jpg

'उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय'.

जानेवारीच्या अखेरपासून पावलं का नाही उचलली? राज ठाकरेंचा सवाल

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केले आहेत. अनेक गोष्टी बंद केल्या आहेत. हे निर्बंध लागू करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रविवारी फोन केला होता व सहकार्याची विनंती केली होती. काल दोन्ही नेत्यांमध्ये ऑनलाइन चर्चा झाली. या भेटीमध्ये नेमकं काय झालं? कुठल्या सूचना केल्या? त्याची माहिती आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन दिली. 

"जानेवारी अखेरपासून लक्षण दिसायला लागली. तेव्हा पाऊल टाकणं आवश्यक होतं. खर्च झाला असता, तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असतं. कोणाला कंत्राट दिलं हे सुद्धा पाहिलं नसतं. आज हॉस्पिटल्स बेड्स देत नाहीत. बेडस असून देत नाहीत. बेडस असताना ते वापरले जात नसतील तर हॉस्पिटल करायची आहेत काय ? राज्यावर संकट येत असताना, हॉस्पिटल्सनी पुढे नको का यायला?" असा सवाल राज ठाकरेंनी केला. 

मुंबईतील हाजी अली, माहिम दर्ग्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम

अनिल देशमुखांसंदर्भातल्या प्रश्नावर अनिल देशमुख महत्वाचा विषय नाही असे त्यांनी उत्तर दिले. "मुकेश अंबानी यांच्या घराखाली पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरुन गाडी ठेवली? हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पोलीस कोणी सांगितल्याशिवाय असं करणार नाही," असा दावा राज ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंना त्यांनी टोलासुद्धा लगावला. एका विनोदाचा दाखला देत ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय'.

- मुंबईतील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image