थर लावायचे नाही, मग हंडी खुर्चीवर उभं राहून फोडायची का? - राज ठाकरे

बाळासाहेबाच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत.
Raj and Uddhav thackeray
Raj and Uddhav thackeray

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. ठाकरे सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. पण मनसेने हा आदेश झुगारुन मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी साजरी केली.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

- मागच्यावर्षी दहीहंडी साजरी केली नव्हती. गेल्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे.

- लॉकडाउन आवडे सरकारला असं झालयं, यात हजारो कोटीची काम वाजवली जात आहेत. ज्याविरोधात कोणी काही बोलायचं नाही. मोर्चे, सभा नाहीत. या कुठल्याही गोष्टी होऊ नयेत, यासाठी दुसरी, तिसरी लाट आणली जातेय.

- बाकी सर्व गोष्टी सुरु आहेत. मेळावे सुरु आहेत. नारायण राणेंविरोधात जे झालं, हाणामाऱ्या सुरु आहेत. मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधवाच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिर उघडी आहेत. मेळावे, सभा सुरु आहेत. बाकीच्यांनी दहीहंडी साजरी करायची नाही.

- गर्दी कमी झालेली दिसतेय का? फुटबॉल, क्रिकेट मैदानावर सुरु आहे. बाळासाहेबाच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही. तुम्ही सणांवरच कसे येता?

Raj and Uddhav thackeray
बाळा नांदगावकर यांनी हंडी फोडलीच; पोलीस-मनसे आमनेसामने

- जनाआशीर्वाद यात्रा चालली, तेव्हा लॉकडाउन नाही, सण आला की लॉक डाऊन, सणांमधून रोगराई पसरते. यात्रे, मेळावे, हाणामारी मधून रोगराई पसरत नाही? यांना जेवढ हवयं तेवढं वापरायचं, बाकीच्यांना बंद करुन ठेवायचं.

- अस्वलाच्या अंगावर किती केस हे अस्वल मोजत नाही, तसं आमच्यावर किती केसेस आहेत, ते आम्ही मोजत नाही. हे सर्व सूडबुद्धीने सुरू आहे.

- मंदिर उघडलीच पाहिजेत. बैठक घेणार आहे. मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार. सगळे सण साजरे झाले पाहिजेत. सगळ्यांना नियम सारखे लावा, एकाला एक दुसऱ्यांना दुसरा नियम असं नाही चालणार.

- हे बाहेर पडायला घाबरतात, याचा आमचा काय दोष. लाटा यायला समुद्र आहे का? उगाच इमारती सील करायच्या. याआधी रोगराई आली नव्हती का? अमेरिकेत लाटा आल्या, ते अमेरिका बघेल.

- आता लोकांना बंद करुन ठेवायचा. यांचे कार्यक्रम झाले, यांची आखणी झाली की, मग निवडणुका जाहीर करायच्या. मग बाकीचे तोंडावर पडतील.

Raj and Uddhav thackeray
'मीठ कमी झालं, तरी किरीट सोमय्या ED नोटीसची धमकी देतील'

- थर लावू नका, मग दहीहंडी कशाने हंडी फोडायची. खुर्चीवर उभं राहून हंडी फोडायची का? तुम्हाला रस नसेल तर नका सहभागी होऊ.

- ठाण्यातील फेरीवाल्याने महिला अधिकाऱ्यावर हल्ला केला, त्यावर राज ठाकरे म्हणाले की, "पोलिसांकडून सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ज्यादिवशी यांची सर्व बोट छाटली जातील. फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही. त्यादिवशी त्यांना समजले. निषेध करुन हे लोक सुधारणारे नाहीत"

- यांची हिंमत ठेचली पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांची बोटं छाटता. आज पकडलं, उद्या बेल होईल. पुन्हा दुसऱ्यांची बोटं छाटायला बाहेर. हफ्ते वसुली सारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी सरकारने बंधनं आणली पाहिजेत. बोट छाटायची हिंमत कोणाची झाली नव्हती आणि हे बेल वरती सुटणार. सुटून बाहेर आल्यावर यांना भीती काय असते ते समजेल ?

- अण्णा हजारे मंदिर उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करणार आहेत, या प्रश्नावर अण्णा कुठे होते इतके दिवस? असा प्रतिप्रश्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com