

MNS Banner Criticism For Amit Thackeray Case
ESakal
ठाणे : मनसेने ठाण्यामध्ये एका व्यंगचित्रात्मक फलकाद्वारे राज्य सरकारच्या दुहेरी भूमिकेवर घणाघाती टीका केली आहे. नितीन कंपनी परिसरात लावलेल्या या फलकाने मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हा आणि भू-घोटाळेबाजांना मिळणारी क्लीन चिट यामधील विरोधाभास तीव्रपणे अधोरेखित केली.