

Manoj Gharat Join BJP
ESakal
डोंबिवली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना कल्याण–डोंबिवलीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभागांतील प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मनसेचे माजी डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या रिंगणातून भाजपाचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधातील उमेदवारी घरत यांनी माघार घेतली होती. त्याचवेळी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. घरत हे भाजपात गेल्याने मनसे पक्षाला ही मोठी हानी असल्याचे बोलले जातं आहे.