

MNS Adopts New Electoral Strategy in Dombivli
sakal
डोंबिवली : मुंबईत कबूतर खाण्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आणि मराठी समाजातील काही घटकांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती. मात्र, कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेने आता डोंबिवलीत वेगळीच राजकीय खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे. एका प्रभागात थेट जैन आणि गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेने ‘जैन कार्ड’ वापरल्याचे बोलले जात आहे.