Chris Gayle : ख्रिस गेल प्रकरणात आता मनसेची उडी; देशी - परदेशी घुसखोरांवर कठोर कारवाईची मागणी !

यलो गेट आणि कुलाबा पोलीसांकडे निवेदन!
MNS jump in Chris Gayle case Demand for strict action against domestic and foreign intruders mumbai shooting
MNS jump in Chris Gayle case Demand for strict action against domestic and foreign intruders mumbai shooting sakal

मुंबई : ख्रिस गेल वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल यांनी मुंबईच्या सुमद्रात बेकायदेशीर चित्रिकरण केल्या संदर्भाचे वृत्त सकाळने प्रकाशित केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनाने उडी घेतली आहे.

मुंबईच्या सामुद्रिक सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या तसेच समुद्रात चित्रीकरण करण्यासाठी बेकायदा घुसलेल्या देशी - परदेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याचा मागणीचे निवेदन सोमवारी (ता.१५)महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनाने यलो गेट आणि कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

गेल्या महिन्यात २७ एप्रिल रोजी एका व्यावसायिक जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी ख्रिस गेल आणि शूटिंग टीमचे इतर सदस्य मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात कोणतीही परवानगी न घेता गेले आणि त्यांनी समुद्रात एका खासगी पानमसाल्याच्या जाहिरातीचे बेकायदा चित्रीकरण केले.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, समुद्रातील बेकायदा चित्रीकरणाची ही घटना जिथे घडली त्याच्याशी संबंधित यलो गेट पोलीस ठाणे, कुलाबा पोलीस ठाणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण, नौसेना, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांपैकी कुणालाही त्यासंदर्भात काहीही माहित नव्हते! यावर विश्वास तरी कसा ठेवायचा?

ख्रिस गेलच्या या बेकायदेशीर जाहिरातीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळून दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना स्वस्थ बसणार नाही अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेचे सरचिटणीस निशांत गायकवाड यांनी दिली.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

ज्या बोटीतून ख्रिस गेल आणि शूटिंग टीम समुद्रात गेले त्या बोटीचा मालक आणि क्रू मेंबर्स यांचीही स्वतंत्र चौकशी व्हायला हवी. सर्वात महत्वाचं म्हणजे, कोणतीही परवानगी नसताना या सर्वांना समुद्रात घेऊन जाणा-या या बोटीची नोंदणी रद्द व्हायलाच हवी. देशातील तसेच परदेशातील लोकांना मुंबईत आणि विशेषत: मुंबईच्या समुद्रात चित्रीकरण करताना अनेक परवानग्या घेणं बंधनकारक आहे.

मात्र जाहिरात निर्मितीचा खर्च वाचवण्यासाठी संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे अनेक कायदेशीर बाबींचे उल्लंघन होऊन लक्षावधी रुपयाचे शासकीय शुल्क गमवावे लागले आहे. शिवाय, मुंबई पोर्ट ट्रस्ट तसंच नौसेनेचा तळ (नेव्हल बेस) या अतिमहत्वाच्या ठिकाणांबाबतच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असेही महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेच्या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com