
डोंबिवली : अंबरनाथमध्ये मनसे शहर संघटकयुसूफ शेख याच्यावर गो हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसूफ याचा भाऊ जलालूद्दीन शेख याच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचा जुना झेंडा असलेल्या गाडीतून तो गोमांसची वाहतूक करत असल्याची बाब समोर आली आहे.