esakal | अमित ठाकरेंची अजित पवारांसोबतची भेट यशस्वी, अजित पवारांनी घेतला 'मोठा' निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

अमित ठाकरेंची अजित पवारांसोबतची भेट यशस्वी, अजित पवारांनी घेतला 'मोठा' निर्णय...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी अमित ठाकरे यांना आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याबाबत ग्वाही दिलीये.

अमित ठाकरेंची अजित पवारांसोबतची भेट यशस्वी, अजित पवारांनी घेतला 'मोठा' निर्णय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी अमित ठाकरे यांना आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याबाबत ग्वाही दिलीये.

आशा वर्कर्सच्या मानधनाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांना आशा वर्कर्सच्या मानधनात २ हजार रुपयांची वाढ करण्याचं आश्वासन दिलं आहे. 

मोठी बातमी पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

दरम्यान अमित ठाकरे यांनी घेतलेली अजित पवार यांची बैठक आशा वर्कर्ससाठी यशस्वी ठरली असंच बोलावं लागेल. याला कारण म्हणजे याआधी आशा वर्कर्सचं जे मानधन साधारण सोळाशे रुपये होतं त्यामध्ये आता आणखी २ हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. याबाबतची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी दिलीये.

याचसोबत कोरोना काळात आशा वर्कर्सनी घरोघरी जाऊन जे काम केलंय त्याचे १५ हजार रुपये मानधन थकीत आहे. हे पंधरा हजार रुपयांचं मानधन देखील आशा वर्कर्सना लवकर मिळावं याची मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केलीये. याबाबतही विचार करू असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी अमित ठाकरे यांना दिलंय. 

mns leader amit thackeray met deputy cm ajit pawar regarding asha worlers honorarium

loading image