mla raju patil and cm devendra fadnavis
sakal
डोंबिवली - मानपाडा, मुंब्रा पोलीस ठाण्याचे विभाजन आणि दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तळ्याकडून तसा प्रस्ताव शासन स्तरावर मांडण्यात आला आहे.
मात्र शासन स्तरावर हा प्रस्ताव प्रलंबित असून तो लवकर मार्गी लावावा याविषयींचे निवेदन मनसे नेते राजू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दिले आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांनी देखील ही मागणी केली यावर हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.