esakal | धक्कादायक प्रकार! रुग्णालयातून कोरोना रुग्णाला पळवले; मनसे कार्यकर्त्याचा प्रताप.
sakal

बोलून बातमी शोधा

hindu sabha hospital

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहातून एक मृतदेह गायब झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी रात्री हिंदुसभा रुग्णालयातून मनसे कार्यकर्त्यानी जादा बिल आकारल्याच्या आरोपाखाली चक्क रुग्णालाच पळवून नेल्याची घटना घडली आहे.

धक्कादायक प्रकार! रुग्णालयातून कोरोना रुग्णाला पळवले; मनसे कार्यकर्त्याचा प्रताप.

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहातून एक मृतदेह गायब झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी रात्री हिंदुसभा रुग्णालयातून मनसे कार्यकर्त्यानी जादा बिल आकारल्याच्या आरोपाखाली चक्क रुग्णालाच पळवून नेल्याची घटना घडली आहे.

कोरोनाबाधित रुग्ण हिंदुसभा रुग्णालयात उपचार घेत होता. रुग्णाची परिस्थिती खालावत असल्याने त्याला आयसीयुमध्ये भरती करण्यात आले होते. दहा दिवसांचे बिल 3 लाख रुपये झाले होते. रुग्णालयाने पूर्ण बिल भरून डिस्चार्ज घेण्यास सांगितले असता उपचाराचे बिल भरण्यास रुग्णाच्या पत्नीने असमर्थता दाखवली. सदर प्रकरण मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्याकडे गेले.  मनसे कार्यकर्त्यानी थेट रुग्णालय गाठत चक्क रुग्णालाच तेथून पळवून लावले. 

हेही वाचा: भाजप महिला नेत्याच्या सोनू सूदला सल्ला,तर संजय राऊतांवर टीका 

बिल थकवल्याने व रुग्णाला पळवून लावल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वैभव देवगिरकर व विश्वस्तांनी मनसे पदाधिकार्या विरोधात घाटकोपर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.

स्टंटबाजी करत रुग्णाला नेणे योग्य नाही:

"रुग्णाची परिस्थितीत पूर्णपणे खालावली होती. त्यांना आयसीयुमध्ये उपचार देऊन त्यांच्यात सुधारणा आणण्याचा डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केला. दोन दिवसात रुग्णाला सोडून देण्यात येणार होते. बिलामध्ये थोडीफार कपात करणार होतो. मात्र रुग्णालयाशी कुणीही थेट संपर्क न साधता थेट स्टंटबाजी करत रुग्णाला नेले जाते हे योग्य नाही", असे हिंदुसभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वैभव देवगिरकर यांनी म्हंटले आहे.   

हेही वाचा: हद्यद्रावक! अखेर 'त्या' जखमी हरणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी...

रुग्णालय पैसे उकळत आहेत: 

"रुग्णाकडून पैसे उकळण्याचा प्रकार सगळीकडेच सुरू आहे. सदर रुग्णाच्या नातेवाईकानी आमच्याशी संपर्क साधला. आम्ही रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. रुग्णाची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. कोरोनाचा फायदा घेत रुग्णालय लूट करत आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही" असे मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी म्हंटले आहे. 

MNS leader take away corona patient from hospital