मनसे घेणार राज्यपाल कोश्यारी यांची भेट..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात उद्या मनसे राज्यपालांची भेट घेणार..

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. अशात महाराष्ट्रातील शेतकरी आपल्याला सरकारची मदत कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहतोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत, म्हणून आता मनसे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात उद्या मनसे राज्यपालांची भेट घेणार आहेत.

शिवसेनेबद्दल नवाब मलिक याचं मोठं वक्तव्य..

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोश्यारी यांची भेट घेतली होती. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेत. या शेतकर्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित  करावा यासाठी फडणवीस राज्यपालांना भेटले. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांच्या आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जातेय. दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची शेतकऱ्यांच्याच प्रश्नावरील राज्यापालांसोबतची एक भेट नेते दौऱ्यावर असल्याने रद्द झाली.  

आता WhatsApp मध्ये सुरु होणार हे नवीन फिचर..

राज्यपालांकडून ओल्या दुष्काळाने बाधित २ हेक्टरपर्यंक शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली गेलीये. प्रति हेक्टरी ८ हजार मदत तर फळबागांसाठी १८ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही मदत तोकडी असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. 

याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात  मनसे नेते उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. 

Webtitle : mns to meet governor bhagatsing koshyari at rajbhawan

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns to meet governor bhagatsing koshyari at rajbhawan