esakal | शिवसेनेबद्दल नवाब मलिक याचं मोठं वक्तव्य..
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेबद्दल नवाब मलिक याचं मोठं वक्तव्य..

उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकी नंतर आघाडीच्या घटक पक्षांशी देखील चर्चा केली जाणार आहे. दरम्यान संबंधित चर्चा सकारात्मक चर्चा झाली की शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा होऊ शकते

शिवसेनेबद्दल नवाब मलिक याचं मोठं वक्तव्य..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. अशात दिल्ली आणि महाराष्ट्रात बैठकांवर बैठका होतायत.  मात्र महाराष्ट्रासाठी गोड बातमी कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. अशात आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होती. ही बैठक इंदिरा गांधी यांची जयंती असल्याने रद्द करण्यात आली. उद्यावर गेलेल्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

पवार जो निर्णय घेतील तो हिताचा असेल : बाळासाहेब थोरात

उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकी नंतर आघाडीच्या घटक पक्षांशी देखील चर्चा केली जाणार आहे. दरम्यान संबंधित चर्चा सकारात्मक चर्चा झाली की शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा होऊ शकते.

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. अशात तिन्ही पक्षांनी एकत्रित आल्याशिवाय महाराष्ट्राला सरकार मिळणार नाही. दरम्यान, राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यासाठी आमचं एकमत आहे. यामुळे आता उद्याची राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेत्यांची उद्याची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. उद्याच्या बैठकीनंतर कदाचित शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांची राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत बैठका होऊ शकतात.   

हिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत; शिवसेनेचे थेट आव्हान

महाशिवआघाडी या नावावर आक्षेप  

राज्याला स्थिर सरकार देणासाठी सकारात्मक चर्चा सुरू आहेत. दरम्यान माध्यमांनी शिवसेना - राष्ट्रवादी - कॉंग्रेस यांच्या एकत्रित येण्याला दिलेल्या महाशिवआघाडी या नावावर नवाब मलिक यानी आक्षेप घेतलाय.  देशात जिथे कुठे आघाडी झाली तिथे कुठल्या एका पक्षाचं नाव कधी त्यात आलं नाही. असंही ते म्हणालेत 

loading image