
डोंबिवली : गुरुवारी विधान भवनच्या लॉबी मध्ये राडा झाला. यावर मनसेचे नेते राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना ही चूक त्यांची नाही त्यांच्या नेत्यांची आहे असे म्हणत टीका केली आहे. जे काही झालं तो प्रकार लाजिरवाणा होता. मला लाज वाटली ते पाहून आपल्या महाराष्ट्राचा युपी बिहार झाला आहे का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.