पैसे घेऊन राज ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही - राजू पाटील

Raju Patil
Raju Patilsakal media

डोंबिवली : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर (bmc election) पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. मनसे पक्षातील कार्यकर्ते फुटण्याआधीच आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे पहायला मिळाले. पक्ष सोडून कोणी जात नाही, जाणार देखील नाही आणि सोडून गेलेल्यांना मी पाहून घेईल असे खोड बोल त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहेत. पैसे घेऊन राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी गद्दारी केलेल्यांना मी सोडणार नाही, हे भोंगे लोकसभा निवडणूकीतच (Loksabha election) विकले गेले होते असे सांगत त्यांनी थेट शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

Raju Patil
मुंबई : दादरमध्ये पालिकेचे मास्कबद्दल धोरण काय ?

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा चार्ज करण्यासाठी मनसेच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांनी कामावर लक्ष द्या, पक्ष बदलाची हवा डोक्यात जावू देऊ नका असे सुतोवाच अप्रत्यक्षरीत्या केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात रविवारी मनसेच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मनसे पदाधिकारी मनोज घरत, प्रकाश भोईर, इरफान शेख, हर्षद पाटील, मंदा पाटील, अरुण जांभळे, संदीप म्हात्रे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्या दरम्यान जवळपास विविध भागातील 800 कार्यकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सुचना दिल्या. बदललेल्या प्रभाग रचनेनुसार त्या प्रभागात जाऊन आता काम करावे लागेल असे सांगितले.

Raju Patil
पनवेल: अंमली पदार्थाच्या गोळ्यांची विक्री करणारा तरुण अटकेत

निवडणूकीच्या तोंडावर पक्षांत फोडोफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शिवसेनेची लाट सध्या वहात आहे. निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जात असल्याची अफवा पसरवली जाते. मात्र कोणीही पक्ष सोडून जात नाही, कोणी जाणार नाही आणि जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मी बघून घेईल असा सज्जड दम भरला. पुढे ते म्हणाले, फोडाफोडीचे राजकारण करू नका आम्हाला देखील ते करता येते. मनसे पक्ष सोडून गेलेले भोंगे लोकसभा निवडणुकीत विकले गेले होते, माझी पण आमदारकी त्यांनी विकली असती, त्यामुळे त्यांना माझ्या क्षेत्रात मी फिरकू दिले नाही. ज्यांनी पैसे घेऊन राज ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे, त्यांना सोडणार नाही.

मोठ्या पक्षात गेल्याने आता आम्हाला कोणाची भिती नाही या भ्रमात त्यांनी राहू नये. तुमचा पक्ष आत्ताच घाबरला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील कल्याण डोंबिवली व ठाणे महापालिका परिसरातील दोन नगरसेवकांची संख्या कमी केली आहे. हे इथेच धाबरले आहेत घाबरले नसते तर अशी पाकीटमारी करत फिरले नसते असे सांगत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर देखील निशाणा साधला.

मनसेतील पदाधिकारी फुटल्यानंतर मनसेचा आवाज गेला असे बोलले जात होते. परंतू मनसेचा आवाज खरेच गेला आहे का असे पाटील बोलताच पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या जोरदार घोषणा दिल्या. यावर पाटील यांनी मनसेचा आवाज असा जावू शकत नाही, आम्ही तो जावू देखील देणार नाही. एक गेला तर आम्ही हजार आणू कोणाच्या जाण्याने पक्ष लयास गेला, पक्ष संपला असे कोणी समजू नये असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com