Raju Patil News : बरे झाले मंत्री, आमदार पण रेल्वे रुळावर आले; मनसेचे एकमेव आमदार असं का म्हणाले?

Raju Patil News : पावसाचा फटका लोकल सेवेला बसल्यामुळे राज्याचे मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे रुळांवरून चालत यावे लागले.
Updated on

डोंबिवली : बरे झाले एका अर्थाने की आमदार पण रेल्वे रुळावर आले वर्षानुवर्ष रेल्वे समांतर रस्त्यांची मागणी होत आहे, मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. आमदार रेल्वे रुळांवर आल्यावर आता तरी त्यांना प्रवाशांच्या खऱ्या समस्यांची जाणीव झाली असेल असे वक्तव्य मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

मुंबईसह उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत होऊन बंद पडली. पावसाचा फटका लोकल सेवेला बसल्यामुळे राज्याचे मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे रुळांवरून चालत यावे लागले. मंत्री आमदारांच्या या रेल्वे रुळावरील पायपीटीवरून मनसे आमदार पाटील यांनी बरे झाले की आमदार एका अर्थाने रेल्वे रुळावर आले असे म्हणत तुला तर लगावलाच. परंतु नागरिकांच्या समस्येची खरी जाणीव आता त्यांना झाली असेल असे म्हणत सर्वसामान्यांच्या मनातील तीव्र प्रतिक्रिया देखील व्यक्त केली.

मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली.

मध्य रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. याशिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्याही रोखण्यात आल्या होत्या. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून या परिस्थितीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांनाच नाही तर आमदार, मंत्र्यांनाही बसला आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी हे रेल्वे रुळावरून चालताना दिसले.

ठाणे पल्याड असलेल्या कल्याण डोंबिवली, दिवा, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी चाकरमान्यांची मोठी गर्दी उसळली होती. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने काही नागरिक रस्ते मार्गाने प्रवास करत होते. मात्र पत्रीपूल, कल्याण शीळ रोडवरील वाहन कोंडीचा सामना त्यांना करावा लागला. यावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील म्हणाले, बरं झालं एका अर्थाने की आमदार पण रुळावर आले.

Raju Patil News : बरे झाले मंत्री, आमदार पण रेल्वे रुळावर आले; मनसेचे एकमेव आमदार असं का म्हणाले?
Mumbai Heavy Rains: विक्रमी पाऊस पडल्यामुळे मुंबईत पाणी साचलं, तरी निचरा वेगाने; CM एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

2004 साली आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तेव्हाचे डोंबिवलीचे आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी रेल्वे समांतर रस्ता असावा ही मागणी केली होती. प्रवासी संघटना मागणी करत आहेत. गेल्या चार वर्षापासून मी याचा सतत पाठपुरावा करतो. परंतु ती मागणी अजूनही काही पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे अशा वेळेस एक पर्यायी रस्ता असायला हवा, लोकांना तो सोयीचा वाटेल असा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे.

दरवर्षी रेल्वेचा प्रॉब्लेम होतो, काही भाग हा खाडी पट्ट्या लगत आहे. अशा वेळेस पावसाचा त्रास होतो. परंतु अशा वेळेस एक पर्याय रेल्वे समांतर रस्ता असला की त्याचा नक्कीच फायदा होईल. मनसेतर्फे आमची मागणी आहे, महाराष्ट्रात देशात एक नंबर राज्य आहे. त्यामुळे रेल्वेसाठी किमान लोकलसाठी महाराष्ट्राचा एक स्वतंत्र रेल्वे बोर्ड असले पाहिजे अशी आमची मागणी आहे.

कल्याण शीळ रोडवरील वाहन कोंडी विषयी आमदार पाटील म्हणाले की, मेट्रोचे काम हे साधारण कल्याण तळोजा पर्यत साधारण 22 किमीचा टप्पा आहे. त्यामध्ये फक्त चार किलोमीटरचा कल्याण शीळफाटा रस्ता आहे. माझी अशी मागणी आहे. काम इतर ठिकाणी चालू करा तोपर्यंत पर्याय रस्ता तयार करा. आणि मग काम चालू करा. परंतु ते अजूनही काय ऐकत नाही. ते बोललेत आम्हाला की टप्प्याटप्प्याने काम बंद करू. येत्या दोन-चार दिवसांनी त्याचा आढावा घेणार आहे.

Raju Patil News : बरे झाले मंत्री, आमदार पण रेल्वे रुळावर आले; मनसेचे एकमेव आमदार असं का म्हणाले?
Pune Hit And Run Case: तो फोटो ठरला शेवटचा! हरवलेल्या मुलीला आई-वडिलांकडे सोपवलं अन् पोलिसाचा अर्ध्या तासातच मृत्यू

विधानपरिषद निवडणूकित मनसेचा पाठिंबा कोणाला असेल याविषयी आमदार पाटील म्हणाले, सध्या तरी मला राज ठाकरे यांच्याकडून कोणते आदेश आलेले नाहीत. त्यांचे आदेश आल्यास त्या अनुषंगाने मतदान करणार असे पाटील यांनी सांगितले.

लंडन वरून येणारी वाघनखे ही शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे याविषयी आमदार राजु पाटील म्हणाले, खरंतर परिस्थिती अशीच असायला हवी. याला ऑथेंटिक असं काही केलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. परंतु माझ स्पष्ट मत आहे की परवा विश्वास पाटील जे पाणीपतकार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांनी एक पोस्ट टाकली होती, की शहाजीराजे यांची कर्नाटक जिल्ह्यात दावणगिरी तालुक्यात जी समाधी आहे. त्या समाधीचा जीर्णोद्धार करा. तिचा जतन करा. तिथे शंभर कोटी खर्च करा. या गोष्टी न करता उगीच भावनिक राजकारणासाठी या गोष्टी चाललेल्या आहेत. परंतु त्या त्यांना सूट होत आहेत त्या करतात अजून काय बोलू शकतो त्यावर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.