Pune Hit And Run Case: तो फोटो ठरला शेवटचा! हरवलेल्या मुलीला आई-वडिलांकडे सोपवलं अन् पोलिसाचा अर्ध्या तासातच मृत्यू

Pune Hit And Run Case: पोलिस हवालदार समाधान कोळी यांनी अपघाताच्या काही मिनिटांपुर्वीच एका हरवलेल्या मुलीला तिच्या आई-वडिलांच्या हवाली केल्याचे पुढे आले आहे.
Police Constable Killed right after he helped missing girl back to her parents Bopodi Hit-and-Run case Marathi Crime News
Police Constable Killed right after he helped missing girl back to her parents Bopodi Hit-and-Run case Marathi Crime News

पुणे : कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघातानंतर पुणे शहरात पुन्हा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री दुचाकीवरील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कारने उडवल्याचा प्रकार समोर आला.

या मोटारीच्या धडकीत मृत्यू झालेले पोलिस हवालदार समाधान कोळी यांनी अपघाताच्या काही मिनिटांपुर्वीच एका हरवलेल्या मुलीला तिच्या आई-वडिलांच्या हवाली केल्याचे पुढे आले आहे. त्याबाबतचा फोटो त्यांनी पोलिसांच्या ग्रुपवर शेअर केला होता. कोळी यांचा तो शेवटचा फोटो ठरला. ज्यात मुलगी, कोळी आणि त्यांचे सहकारी संजोग शिंदे आहेत.पोलिसांच्या ग्रुपवर एक वाजून सात मिनीटांनी हा फोटो अपलोड करण्यात आला आहे.

Police Constable Killed right after he helped missing girl back to her parents Bopodi Hit-and-Run case Marathi Crime News
Pune Worli Hit And Run Case: 'हिट अँड रन' प्रकरणाने पुणे पुन्हा हादरलं! बीट मार्शलला इनोव्हा कारने उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गस्तीवर असलेले समाधान कोळी आणि शिंदे यांना खडकी भागातील एका बस स्थानकावर रात्री अकराच्या सुमारास एक मुलगी आढळून आली. एकटीच मुलगी रात्री उशिराने स्थानकावर असल्याचे आढळून आल्याने दोघांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी मुलीकडून तिच्या आई वडिलांचा नंबर घेतला असता व त्यांनी फोन केला. मुलगी व तिच्या घरचे पिंपळे सौदागर भागात राहात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

Police Constable Killed right after he helped missing girl back to her parents Bopodi Hit-and-Run case Marathi Crime News
Jay Shah: जगभरातील क्रिकेटची सूत्र येणार जय शाह यांच्या हाती? ICC अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार

पोलिसांच्या ग्रुपवर एक वाजून सात मिनीटांनी हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गस्तीवर असलेले समाधान कोळी आणि शिंदे यांना खडकी भागातील एका बस स्थानकावर रात्री अकराच्या सुमारास एक मुलगी आढळून आली. एकटीच मुलगी रात्री उशिराने स्थानकावर असल्याचे आढळून आल्याने दोघांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी मुलीकडून तिच्या आई वडिलांचा नंबर घेतला असता व त्यांनी फोन केला. मुलगी व तिच्या घरचे पिंपळे सौदागर भागात राहात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

दोन्ही पोलिसांनी मुलीच्या आई-वडीलांना बसस्थानकाजवळ बोलावून घेतले व सर्व खातरजमा करून मुलीला ताबा त्यांच्याकडे सोपवला. या कामगिरीचा फोटो पोलिस कोळी आणि शिंदे यांनी रात्री एक वाजून सात मिनिटांनी पोलिसांच्या ग्रुपवर वर पोस्ट केला होता. त्यानंतर दोघे खडकी बाजार भागात आले. तिथून ते बोपोडी भागात आले असताना अपघात झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com