
कल्याण : जरी मरी नगर, छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी, चिकणीपाडा, विजयनगर, आमराई व अन्य काही भागांत मागील काही महिन्यांपासून काही दिवशी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगत मनसेने महापालिकेच्या '५-ड' प्रभाग क्षेत्र कार्यालयात टॉवेल बनियन घालून आमदार संजय गायकवाड यांच्या स्टाईलने आंदोलन केले आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाला निवेदन देत समस्या न सुटल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा उपअभियंत्यांना दिला आहे.