
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय डाव टाकला आहे. शहरात नव्या पद्धतीने मोर्चेबांधणी करत मनसेने अनेक विधानसभा विभागांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. "कामात कुचराई वा तडजोड खपवून घेतली जाणार नाही!" असा कडक इशारा ही राज ठाकरे यांनी दिला आहे.