कल्याणमध्ये मनसेकडून हनुमान चालीसा पठण | Raj Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Party

कल्याणमध्ये मनसेकडून हनुमान चालीसा पठण

डोंबिवली : प्रार्थनेला विरोध नाही, मात्र मशिदीवरील भोंगे (Loudspeakers in mosques) काढावेच लागतील असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला (Maharashtra government) दिले होते. भोंगे उतरले नाही तर त्याच्या दुपट्टीने लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा देखील दिला होता. त्यानुसार मनसैनिकांनी लाऊड स्पिकरवर हनुमान चालिसा (Hanuman chalisa) लावण्यास सुरुवात केली आहे. घाटकोपनंतर कल्याणमधील मनसैनिकांनी लाऊड स्पिकर लावत त्यावर हनुमान चालीसाचे पठन सुरु केले आहे. ये तो बस झाकी है मशिद अभी बाकी है असा इशारा यावेळी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला.

हेही वाचा: नवी मुंबई : शौचालयातून पाणी भरण्याची नामुष्की; जनआंदोलनाचा इशारा

कल्याण पश्चिमेतील साई चौकात सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पिकर लावून हनुमान चालीसा चे पठण मनसैनिकांनी सुरु केले आहे. राज साहेबांनी आदेश दिल्यानंतर मनसैनिक ते करणार नाही असे होऊ शकत नाही. राज यांनी राज्य सरकारला आदेश दिले आहेत की मशिदीवरील भोंगे निघाले नाही तर त्याच्या दुपट्टीने लाऊड स्पिकर लावून हनुमान चालीसा लावू. त्यानुसार साई चौकात जिल्हा कार्यालयासमोर आम्ही लाऊड स्पिकरवर हनुमान चालिसा पठन सुरु केले आहे. ये तो एक झाकी है मशिद अभी बाकी है असे उल्हास भोईर म्हणाले. यावेळी मनसैनिकांनी जय श्री रामचा नारा देखील दिला.

Web Title: Mns Party Starts To Read Hanuman Chalisa In Kalyan On Loudspeaker In Mosques Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeraymnskalyan
go to top