
कल्याण : शहरात अनेक दिवसांपासून दररोज सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सर्व चौक तसेच विविध मार्गावर वाहतूक कोंडी झालेली असते. तरीही वाहतूक विभागाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत असल्याचे दिसत नाही. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे काही नागरिकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. त्यामुळे कल्याण शहरातील वाहतूक समस्या त्वरित न सुटल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा इशारा मनसेच्या वतीने वाहतूक विभागाला निवेदनातून देण्यात आला आहे.