esakal | 'कुठे महाराष्ट्राचं वैभव तर कुठे युपीचं दारिद्र्य'; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

'कुठे महाराष्ट्राचं वैभव तर कुठे युपीचं दारिद्र्य'; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा सुरू असून. योगी आदित्यनाथ आज उद्योजक व चित्रपट सृष्टीतील लोकांची ते भेट घेऊन चर्चा करणार आहे.

'कुठे महाराष्ट्राचं वैभव तर कुठे युपीचं दारिद्र्य'; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी

sakal_logo
By
निलेश मोरे

घाटकोपर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा सुरू असून. योगी आदित्यनाथ आज उद्योजक व चित्रपट सृष्टीतील लोकांची ते भेट घेऊन चर्चा करणार आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला शिवसेनेसह मनसेने विरोध केला आहे. राज्यातील चित्रपट सृष्टी व उद्योग राज्याबाहेर हलवण्याचा आरोप होत आहे तर हा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना व मनसे दोघेही एकत्र आले आहेत.

मनसेने मुंबईत मराठीत पोस्टर लावत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता त्यांना ठग म्हंटले आहे.तर पोस्टर वर " कहा राजा भोज .. और कहा गंगू तेली .. कुठे महाराष्ट्रच वैभव तर कुठे यूपीचं दारिद्र ..असे लिहिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्वागत करू मात्र उद्योग नेण्याचा डाव असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तर तसा प्रयत्न जरी झाला तर मनसैनिक रस्त्यावर उतरतील आणि इतिहास घडवतील असे मनसैनिक म्हणत आहेत.

हेही वाचा - जनसुविधा व आर्थिक शिस्तीसाठी महापालिकांची बाँड उभारणी महत्त्वाची - योगी आदित्यनाथ 

योगींच्या दौऱ्यावरून शिवसेनेचीही टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 9ः15 च्या सुमारास त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट दिली. मुंबईतील चित्रपट उद्योगाच्या धर्तीवर उत्तरप्रदेशात चित्रपट उद्योग उभा राहावा असे त्यांनी म्हटले होते. ते या दौऱ्यात चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनाही भेटणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

योगी अदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की,  'भाजपनेते मुंबईची फिल्मसिटी हलवण्याचा घाट घालत आहेत. या आधीसुद्धा ग्रेटर नोयडामध्ये फिल्मसिटी उभारण्यात आली आहे. त्याठिकाणी काय काम सुरू आहे. याचीही माहिती लोकांसमोर ठेवावी. योगी अदित्यनाथ यांना त्यांच्या राज्यात फिल्म सिटी उभारायची असेल तर स्वागत आहे. परंतु म्हणून ते तामिळनाडू, पश्चिम बंगाल किंवा इतर ठिकाणच्याही फिल्मसिटीला भेट देणार आहेत का? की फक्त तुम्हाला मुंबईशी पंगा घ्यायचाय? योगीजी आमचे मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत फिल्मसिटी उभारावी आणि ती चालवून दाखवावी. आमच्याकडेचे जलसा, प्रतिक्षा इत्यादी बंगलेसुद्धा उत्तरेत हलवणार आहेत का? मुंबईची फिल्मसिटी हलवणं गंमत आहे का? या फिल्मसिटी साठी आम्ही घाम गाळलाय'. अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली.

MNS poster campaign against Yogi Adityanath

------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )

loading image