डोंबिवलीकरांना राज ठाकरेंची भावनिक साद.. काय म्हणतायत राज ठाकरे ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

मुंबईमधील सगळ्यात जास्त गर्दीचं स्थानक म्हणजे डोंबिवली. खास, डोंबिवलीकरांना राज ठाकरे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. सोशल मिडियावर तसा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

मुंबईमधील सगळ्यात जास्त गर्दीचं स्थानक म्हणजे डोंबिवली. खास, डोंबिवलीकरांना राज ठाकरे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. सोशल मिडियावर तसा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

दररोज लोकलट्रेनचा प्रवास करताना लाखो मुंबईकर जीवाचं रान करतात. लोकल ट्रेनमध्ये रोज लाखो मुंबईकर चेंगरले जातात आणि तरीही सरकार बुलेट ट्रेनचा घाट घालतेय. त्यामुळे एका सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला मत देणार का असा सवाल आता या मनसेच्या व्हिडीओतून विचारला जातोय. 

 

 

मेट्रोवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात.. 

दरम्यान मेट्रोवरून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केलाय. मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल असं राज ठाकरेंनी म्हंटलय. तसच महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल महाग का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. देशावर आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल, हे अतिशय धक्कादायक असल्याचंही राज ठाकरेंनी म्हंटलंय. मुंबईतून देशाला सर्वाधिक टॅक्स हा मुंबईतू मिळतो. शिवसेना भाजपाने 2014 मध्ये रस्ते टोलमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं ? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  

महाराष्ट्राला हवा सक्षम विरोधीपक्ष.. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या प्रचाराचा धडाका लावलाय. एकेकाळी, हा महाराष्ट्र माझ्या हातात द्या, महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो बोलणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये वेगळीच रणनीती आखली आहे सध्या राज ठाकरे महाराष्ट्रातील जनतेला मनसेला विधानसभेत सक्षम विरोधीपक्षचा दर्जा मिवाणून द्या असा जोगवा मागतायत. 

WebTitle : MNS president raj thackeray ask emotional question to citizens of dombivali check what


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS president raj thackeray ask emotional question to citizens of dombivali check what