दम असेल तर राज ठाकरेंना... ; मनसे आमदाराचं अबू आजमींना ओपन चॅलेंज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns Raj Thackeray bhonge dispute over the mosque Abu Azmi raju patil mumbai
दम असेल तर राज ठाकरेंना... ; मनसे आमदाराचं अबू आजमींना ओपन चॅलेंज

दम असेल तर राज ठाकरेंना... ; मनसे आमदाराचं अबू आजमींना ओपन चॅलेंज

डोंबिवली : मशिदीवरील भोंगे हटले पाहिजेत या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर सपाचे आमदार अबू आजमी यांनी राज यांना अटक करून तुरुंगात टाका अशी मागणी केली होती. याला मनसे आमदार राजू पाटील यांनी दम असेल तर टाकून बघा असे बोलत आजमी यांना खुले आव्हान दिले आहे. मशिदीवरील भोंगे मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चिला जात असून राज ठाकरे व मनसे पक्षावर आरोप होत असताना मनसेचे आमदार पाटील मात्र प्रत्येकाला करार उत्तर देताना दिसत आहे.

मशीदींवरील भोंग्याच्या मुद्दयावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांना अटक करुन तुरुंगात टाका अशी मागणी आमदार आजमींनी केली आहे. याला उत्तर देताना मनसे आमदार राजू पाटील यांनी आमदार आजमी यांना सज्जड दम भरत 'दम असेल तर तुरुंगात टाकून दाखवा' असे म्हणत खुले आव्हान दिले आहे.

Web Title: Mns Raj Thackeray Bhonge Dispute Over The Mosque Abu Azmi Raju Patil Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..