
अमित ठाकरेंवरुन टिप्पणी करणाऱ्या दिपाली सय्यद यांना मनसेचं प्रत्युत्तर
मुंबई : भोंगा प्रकरणावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यावरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी अमित ठाकरेंचा उल्लेख करत टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता मनसेनं "नया है आप" असं म्हणतं प्रत्युत्तर दिलं आहे. (MNS reply to Deepali Syyed who commented on Amit Thackeray)
हेही वाचा: अयोध्या दौरा : राज ठाकरेंना आता भोजपुरी गाण्यातून इशारा!
दिपाली सय्यद यांनी मनसेवर टीका करताना डिवचण्याच्या उद्देशानं ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, "तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है। उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है। किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको"
दरम्यान, सय्यद यांच्या या ट्विटला मनसेचे प्रवक्ते आणि सचिव योगेश खैरे यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. खैरे यांनी ट्विट करत म्हटलं की, "तुम्या मालूम नही रहेग्या... नया नया पॉलिटिक्स आया है ना....राज ठाकरे साहेब घर मै बैठा के फेसबुक लाईव करने वाले लीडर नही है.... सौ से ज्यादा आंदोलन के केस है उनपे... जरा मालूमात किया तो बरा रहेगा! नया है आप!!"
हेही वाचा: ओबीसी आरक्षण: आदर्श उत्तरासाठी तिन्ही सरकारांचे प्रयत्न आवश्यक - नरके
शिवसेनेत प्रवेशानंतर दिपाली सय्यद या गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चांगल्याच अॅक्टिव्ह झाल्या असून त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानंही केली आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केल्याच्या घटनेवरुन त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत ही गाडी मोदींची असती तरी शिवसैनिकांनी फोडली असती अस त्या म्हणाल्या होत्या. त्यावरुनही मोठा वाद निर्माण झाला होता.
Web Title: Mns Reply To Deepali Syyed Who Commented On Amit Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..