
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला वेगळी दिशा देत मराठी हित आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर सर्व पक्षांनी एकजुटीने लढण्याची गरज व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी नुकतेच एकत्र येण्याबाबत सकारात्मक विधाने केली असताना, देशपांडे यांनी या एकजुटीचा विचार फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसावा, असा सल्ला दिला आहे. त्यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी, हिंदी सक्तीविरोधात आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठीप्रेमींनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.