esakal | मनसेच्या व्हिडिओची आदित्य ठाकरेंकडून दखल, घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या व्हिडिओची आदित्य ठाकरेंकडून दखल, घेतला मोठा निर्णय

वरळीतील एका पबमधला व्हिडिओ मनसे नेते संतोष धुरी यांनी सोशल मीडियावर शेअर केला.  या व्हिडिओत एक पबमध्ये नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसलं.

मनसेच्या व्हिडिओची आदित्य ठाकरेंकडून दखल, घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: वरळीतील एका पबमधला व्हिडिओ मनसे नेते संतोष धुरी यांनी सोशल मीडियावर शेअर केला.  या व्हिडिओत एक पबमध्ये नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसलं. तसंच हा पब रात्री उशिरापर्यंत सुरु होता. वरळीतील अनेक हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरु असतात.  वरळी हा मतदारसंघ राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आहे.  त्यामुळे वरळी महाराष्ट्राच्या बाहेर आहे का, असा सवाल धुरी यांनी उपस्थित केला. यानंतर आदित्य ठाकरेंवर विरोधकांनीही टीका केली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी वरळीतल्या पबवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती दिली. 

वरळीमधील लोअर परळ भागात मध्यरात्री उशिरापर्यंत काही पब्ज सुरू होते. त्याबद्दल माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील कारवाई केली जाणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनात केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील वरळी परिसरातील जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.  त्या पब मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आणि पब सील करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असला तरी काही हरकत नाही नियम सर्वांना समान आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.  अधिकाऱ्यांची जबाबदारी असते ती त्यांनी राखली पाहिजे, असं अस्लम शेख म्हणालेत. 

हेही वाचाCovid19 vaccination: जेजे रुग्णालयात शरद पवार यांनी घेतली कोरोना लस

मनसेचे नेते संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात ज्यात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वॉर्डचाही समावेश होतो, तिथले सगळे पब्ज विक एंडला कसे फुल्ल सुरू असतात याची पोलखोल केली.

MNS Santosh Dhuri Share Worli Pub Video Aditya Thackeray said action will taken

loading image