'आई, बबड्यासाठी एव्हढं तर करणारच'; महापौर पेडणेकरांवर मनसेची पुन्हा खोचक टीका

तुषार सोनवणे
Saturday, 22 August 2020

मनसे नेते संतोष धूरी यांनी महापौरांच्या मुलाला कंत्राट देण्याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'मी, माझं आणि मलाच, आई बबड्यासाठी एवढं तर करणारच'

मुंबई - वरळी येथील जंम्बो कोव्हिड केंद्रात कामगार पुरविण्याचे कंत्राट महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला मिळाले असल्याचा आरोप करत मनसेने महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.या प्रकाराबाबत लोकायुक्तांबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे आज मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी म्हटलं होतं.  किशोरी पेडणेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारुन महापौरांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली. त्यावर महापौरांनी आरोपांचं खंडन केलं होतं. तरीदेखील याप्रकरणी मनसेने आपला आक्रमक पवित्रा सोडलेला नाही. आता मनसेचे संतोष धूरी यांनी महापौरांवर निशाना साधला आहे.

कार चालकाला ठोठावला हेल्मेट न घातल्याचा दंड; ई चलान पाहून चालकाची पोलिसांत धाव

मनसे नेते संतोष धूरी यांनी महापौरांच्या मुलाला कंत्राट देण्याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'मी, माझं आणि मलाच, आई बबड्यासाठी एवढं तर करणारच'

 मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नंतर संतोष धूरी यांनीही महापौरांच्या मुलाला कंत्राट दिल्याने निशाना साधला आहे. त्यांनी #ResignMumbaiMayor असा हॅशटॅग वापरत महापौरांनी राजीनामा देण्याच्या भूमीकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.  देशपांडे यांच्या टीकेनंतर याप्रकरणाचे पडसाद हळुहळु पडायला लागले आहेत.

या आधी देखील संदीप देशपांडे यांनी ''महापौरांच्या मुलाला कंत्राट मिळणे गैर नाही पण महापौरांच्या मुलालाच कंत्राट मिळणे गैर '' असेही म्हटले होते. 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS sharply criticizes Mayor Pednekar again