'भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही', मनसेचा शिवसेनेला टोला

raj-uddhav.jpg
raj-uddhav.jpg

महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवणारे हिंदूह्दयसम्राट दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. आज संध्याकाळी  ५.३० वाजता दादरच्या वीर सावरकर मार्गावरील महापौर निवासात स्मारकाच्या भूमिपूजनाचा  कार्यक्रम होणार आहे. बाळासाहेबांचे सुपूत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पाडणार आहे. मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती आहे. शिवाजी पार्क येथील महापौर निवासात बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी शिवसेना सुरुवातीपासून आग्रही होती.

कारण दादर शिवाजी पार्क मैदानाशी शिवसेनेचं एक वेगळ नातं आहे. शिवाजी पार्कच हे मैदान बाळासाहेबांनी आपल्या सभांनी गाजवलं आहे. त्याच मैदानाजवळ बाळासाहेबांच भव्य स्मारक उभं राहणार आहे. 

दरम्यान या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला टोला लगावला आहे. "स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही" असं संदीप देशपांडेंनी टि्वट केलय. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com