
डोंबिवली : शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम आणि खेळ यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या डीएसओ क्रीडा स्पर्धांमधील गैरव्यवस्थापन आणि अकार्यक्षमता यामुळे अनेक शालेय खेळाडूंचे मोठे नुकसान होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्याबाबत लेखी निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत.