Maratha Reservation Protest: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, आता त्यांच्या राहण्याची आणि जेवण्याचं मोठं आव्हान निर्णय झालं आहे.