मनसेची नवी मुंबईतल्या थायरोकेअर लॅबवर धडक; चुकीचे अहवाल येत असल्यामुळे घेतली आक्रमक भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

नवी मुंबईतील तुर्भे भागात असणाऱ्या थायरोकेअर लॅबमधून कोरोनाचे चुकीचे अहवाल येत असल्यामुळे या लॅबविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत लॅबवरच धडक देत लॅब बंद पाडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी नवी मुंबईचे उपशहरप्रमुख नीलेश बाणखिले उपस्थित होते.

मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे भागात असणाऱ्या थायरोकेअर लॅबमधून कोरोनाचे चुकीचे अहवाल येत असल्यामुळे या लॅबविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत लॅबवरच धडक देत लॅब बंद पाडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी नवी मुंबईचे उपशहरप्रमुख नीलेश बाणखिले उपस्थित होते.

काही दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये काही खासगी लॅब हेराफेरी करत असल्याचा आरोप होत आहे. तुर्भे एमआयडीसीमध्ये असणाऱ्या थायरोकेअर लॅबमध्येही चुकीचे अहवाल येत असल्यामुळे मनसे आक्रमक झाली.

हेही वाचा: कुठे बस पडली बंद तर कुठे सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी; मुंबईकर म्हणतायत हे काही 'बेस्ट' नाही... 

तुर्भे पोलिसांच्या मदतीने मनसेने थेट खासगी लॅबवर धडक मारली. यानंतर लॅब बंद करण्यात आली असून, लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लॅब सुरू करणार करण्यात येणार आहे. 

थायरोकेअर लॅबमधून खोटे अहवाल मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर ठाणे, पनवेल महानगरपालिकेने येथे कोरोना टेस्टसाठी अहवाल पाठवणे बंद केले होते . मात्र नवी मुंबई येथील नमुने येथे टेस्टसाठी पाठवण्यात येत होते.  

मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे येथील थायरोकेअरच्या मुख्यालयावर धडक देऊन आंदोलन करण्यात आले. ही लॅब बंद करण्यात आली, अशी माहिती नवी मुंबई उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखिले यांनी दिली.

हेही वाचा: मुंबईकरांनो, तुमचा लाडका वडापाव तुमच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनानंतर सर्व प्रशासकीय व्यवस्था हादरली आहे. पुढील सर्व अहवाल येईपर्यंत थायरोकेअर लॅब संपूर्णपणे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

MNS took action against thyrocare lab in navi mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS took action against thyrocare lab in navi mumbai