VIDEO : लॉकडाऊन वाढवलं म्हणून मुंबईत हजारो नागरिक उतरलेत रस्त्यावर, लोकांचा धीर सुटतोय ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीप्रमाणे या सर्वांच्या जेवणाची आणि रेशनची सोय सरकारकडून करण्यात येणार आहे. 

मुंबई - आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घोषित केला. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे मुंबईतील वांद्रे भागातील शेकडो स्थलांतरीत नागरिकांनी आज रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. मुंबईतील वांद्रे येथे या हजारो नागरिकांनी विरोध प्रदर्शन केले. या सर्व नागरिकांनी त्यांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी वांद्रे इथं हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. त्यानंतर पोलिस, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आज दुपारी ३ वाजेपासून या सर्वांनी गर्दी करायला सुरवात केली होती. दरम्यान आता समोर येणाऱ्या माहितीनुसार या सर्वांना पांगवण्यात पोलिसांना यश आलंय.

FACT CHECK : सोशल मीडियावरील कोरोनाबाबतचे हे दावे ठरलेत खोटे!

या सर्वांना आज लॉकडाऊन संपेल आणि आपण आपल्या गावी म्हणजेच उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये पुन्हा जाऊ असं या सर्वांना वाटत होतं. यासाठी विशेष गाडीची देखील सोय होईल असं देखील वाटत होतं. याच पार्श्वभूमीवर या सर्व कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीप्रमाणे या सर्वांच्या जेवणाची आणि रेशनची सोय सरकारकडून करण्यात येणार आहे. 

सध्या पोलिसांनी या सर्वांना समजावून ये भागातील गर्दी कमी केलेली आहे. मात्र या घटनेमुळे सोशल डिस्टंसिन्गचा सपशेल फज्जा उडालेला दिसून आला.

mob of thousands gathered in bandra after extension of lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mob of thousands gathered in bandra after extension of lockdown