मोबाईल चोराने सांगितली आपली करुण कहाणी आणि लोकांना आली दया, चोराला दिलं...

मोबाईल चोराने सांगितली आपली करुण कहाणी आणि लोकांना आली दया, चोराला दिलं...

मुंबई - लॉकडाऊनचा आपल्या सर्वांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झालाय. मोठ्या प्रमाणात फोफावलेला कोरोनाचा संसर्ग, मार्च महिन्यापासून बंद असलेलं कामकाज, आणि आसपास पसरलेलं नकारात्मक वातावरण. या सर्वांचा आपल्या विचारांवर मनावर मोठा परिणाम झालाय. यामुळेच आता गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय. पोलिसांकडूनही तशी आकडेवारी समोर येतेय. 

याचाच प्रत्यय ठाण्यालगत असलेल्या दिवा गावात आला. दिवा गावातील सावे या भागात डी जी कॉम्प्लेक्समध्ये एका माणसाला लोकांनी मोबाईल चोरी करताना पकडलं. आता मोबाईल चोर पकडला गेलाय म्हंटल्यावर तिथल्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देखील दिला. नुसताच चोप नाही तर इथल्या नागरिकांनी त्या चोराला बांधून देखील ठेवलं. आपली चोरी फसली आणि चोर गयावया करू लागला. मला सोडून द्या, माफ करा अशा विनवण्या करू लागला.

दरम्यान नागरिकांनी, "तू चोरी का केली" असा प्रश्न विचारला असता चोरांनी आपली करुण कहाणी सांगितली. चोराची ही करुण कहाणी ऐकून सर्वांना त्या चोराची दया आली आणि त्यांनी चोराला सोडून दिलं.

कामाच्या शोधात मुंबईत आलो. मात्र तीन महिन्यांपासून मुंबईत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काही काम नाही मिळालं. तीन महिने अक्षरशः उपासमार झाली आणि शेवटी चोरीमारी करायला लागल्याचा निर्वाळा या चोराने दिला.

सोबतच आमची एक गॅंग असल्याचीही कबुली त्याने दिली. चाळीत खिडकीत ठेवलेले मोबाईल मारणं सोपं असतं. आम्ही अनेकांचे मोबाईल मारलेत हेही त्याने काबुल केलं. हातात काम नसल्याने आम्ही हे करतो हे सांगितल्यावर लोकांना त्याची दया आली आणि पोलिसात तक्रार दाखल न करता लोकांनी त्याला सोडीं दिलंय 

mobile thief caught by people of digha but after listening to them they let that thief go

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com