मोहित कंबोज, रश्मी शुक्ला यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohit Kamboj, Rashmi Shukla, Devendra Fadnavis

मोहित कंबोज, रश्मी शुक्ला यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई - भाजपचे नेते मोहित कंबोज आणि पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. कंबोज हे मागील २४ तासांत केलेल्या अनेक ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते कारागृहात जाणार, असं ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

हेही वाचा: गडकरींचे अडवाणी होतायत? संसदीय समितीतून पत्ता कट होण्यामागचं राजकारण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता लवकरच कारागृहात जाणार असल्याचा सूचक इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांच्याकडून देण्यात आला होता. त्यानंतर तो बडा नेता म्हणजे अजित पवार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना अद्याप क्लिनचीट मिळाली नसल्याचही आज समोर आलं आहे.

दरम्यान मोहित कंबोज यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने विरोधी पक्षातील नेत्यांच्या चौकशी संदर्भातील चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी कंबोज यांना विचारलं असता ते म्हणाले की, फडणवीस यांची भाजपच्या संसदीय कार्य समितीत निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो.

हेही वाचा: विनायक मेटेंचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात; गाडीत होते सहा जण

दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या रश्मी शुक्ला यांनी देखील फडणवीसांची भेट घेतल्यामुळे त्या महाराष्ट्रात येणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या सध्या हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

Web Title: Mohit Kamboj Rashmi Shukla Met Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..