मोखाडा : जव्हार मधील जुन्या पोलीस वसाहतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही | Jawhar fire update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire in old police society of jawhar

मोखाडा : जव्हार मधील जुन्या पोलीस वसाहतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

मोखाडा : जव्हारमधील मुख्य बाजारपेठेत (jawhar market) असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीला (old police society)  बुधवारी दुपारी अचानक भीषण आग (fire) लागली. या वसाहतीमध्ये  9 पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब राहतात. जव्हार नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने (fire Brigade) व स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे. सदरची आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा: मुंबई : भारतातील प्रमुख ठिकाणच्या कार्यालयांचे भाडे वर्षभर स्थिर

जव्हारच्या बाजारपेठेतील मध्य वस्तीत जुनी व लाकडी पोलीस वसाहत ( चाळ ) आहे. या वसाहतीमध्ये 10 खोल्या, असून त्याठिकाणी आता 9 पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटंब राहत आहेत. सदर इमारत ही खूप जुनी असून, लाकडी वासे व कौलारू छप्पराची आहे. येथील लाईट फिटिंग ही जुनी होऊन जीर्ण झालेली आहे. या वसाहतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली आहे. शॉक सर्किट मूळे आग लागल्याची, प्राथमिक माहिती जव्हार पोलीसांनी दिली आहे. वसाहत जुनी लाकडी चाळीची असल्याने, आगीने रौद्र रूप धारण केले व आगीचा भडका वाढत गेला. 

दरम्यान, शोभा आळे या महिला पोलीस नाईक या कर्मचाऱ्यांच्या खोलीला आग लागली होती. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. आग लागल्याचे समजताच ईतर खोल्यांमधील वास्तव्यास असलेले कुटुंब घराबाहेर सैरावैरा पळत सुटली. तातडीने जव्हार नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने व स्थानिक नागरीकांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली आहे. त्यामुळे जीवितहानी व मोठी वित्तहानी टळली आहे. मात्र, शेजारील काही घरांना आगीची झळ बसली असून, घरांचे व सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

"मी ड्युटीवर असताना माझ्या खोलीला अचानक आग लागली असून माझ्या घरातील सर्व साहित्य, कपडे, इतर सामानाचे भरपूर नुकसान झाले आहे. घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही."

- शोभा आळे, पोलीस नाईक, जव्हार पोलीस ठाणे.

loading image
go to top