मुंबई : भारतातील प्रमुख ठिकाणच्या कार्यालयांचे भाडे वर्षभर स्थिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : भारतातील प्रमुख ठिकाणच्या कार्यालयांचे भाडे वर्षभर स्थिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतातील प्रमुख औद्योगिक व कार्यालयीन शहरांमधील ऑफिसचे भाडे वर्षभर साधारण स्थिर राहील, असा अंदाज मालमत्ता सल्लागार संस्थांनी वर्तविला आहे. गेला वर्षभर कोरोनाच्या फैलावामुळे अनेक कार्यालये बंद राहिली तर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम चा पर्याय दिला. आता कोरानाचा विळखा सैलावत असला तरीही कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु झाली नाहीत. तसेच अनेक कंपन्यांमध्येही संमिश्र मॉडेल वापरले जात आहे. त्यामुळे सध्याचीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

मुंबई, बंगळुरू तसेच एनसीआर (दिल्ली परिसर) येथे कार्यालयांचे प्रामुख्याने केंद्रीकरण झाले असून ही तीन शहरे म्हणजे देशातील कार्यालयांची प्रमुख बाजारपेठ आहे. तेथे यावर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील भाड्याचे दर तेच राहिले होते व पुढील वर्षातही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मुंबई : शिक्षण संचालकांसह इतर बड्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता

बंगळुरूच्या कार्यालयांचे सरासरी भाडे एप्रिल ते जून या तिमाहीत घटले होते तर या तिमाहीतही ते तसेच आहे. दिल्ली एनसीआर तसेच मुंबईच्या बीकेसी परिसरातील दरही या तिमाहीत स्थिरच राहिले आहेत. मागील तिमाहीत मुंबईचे दर सुमारे दोन टक्के घटले होते. आशियाई देशांमध्ये येत्या वर्षात फक्त तैपेईमधील कार्यालयांचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. नाईट फ्रँक या मालमत्ता सल्लागार संस्थेच्या एशिया पॅसिफिक प्राईम ऑफिस रेंटल इंडेक्स अहवालात वरील बाबी नमूद केल्या आहेत.

loading image
go to top